शस्त्रे खरेदीसाठी गुंडांचा ऑनलाईनचा फंडा

Foto
औरंगाबाद :  सुमारे दीड वर्षांपूर्वी समोर आलेल्या ऑनलाइन शस्त्र विक्रीचा फॉर्म्युला आता शहरातील गुंडांनी चांगलाच अवलंबलेला दिसत आहे.सर्रास तलवार, चाकू,गुप्ती सारखे घातक शस्त्रे चक्क घरपोच मिळत असल्याने गल्लीबोळात ही शस्त्रे पोहोचली आहेत. मात्र पोलीस प्रशासन  मात्र सुस्त  असल्याचे दिसत  आहे. लवकरच या ऑनलाइन कंपन्यांवर कारवाई करून हा प्रकार थांबवला गेला नाही तर येत्या काळात मोठी घटना घडू शकते हे नाकारता येत नाही.

अवघ्या दीड महिन्यावर औरंगाबाद मनपा ची निवडणूक येऊन ठेपली असताना तडीपार करण्यात आलेले 100 पेक्षा अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगार पुन्हा शहरात दाखल झाले आहेत.शहरात शांतता नांदावी म्हणून पोलीस प्रयत्नशील असतात मात्र सायबर पोलीस विभाग शस्त्रे खरेदी विक्रीकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसते.
आजघडीला ऑनलाइन शस्त्रे खरेदी करणे खूपच सोपे झाले आहे.ज्या प्रमाणे आपण   कपडे,इलेकंट्रोनिक वस्तू  किंवा इत्यादी साहित्य ऑनलाइन मागवत असतो त्याच प्रमाणे आता तलवार, चाकू, गुप्ती, जंबिया, सारखे प्राणघातक शत्रे सहज रित्या उपलब्ध होत आहे.यामुळे आता गल्लीबोळासह महाविद्यालयीन विद्यार्थी देखील बाळगतात. अलीकडच्या काळात पुंडलीकनगर मध्ये शिवजयंतीच्या दिवशी तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली होती तर चाकू लावून लुटण्याचे अनेक प्रकार शहरात घडले.या घटनेला कुठेतरी हे ऑनलाइन मिळणारे शस्त्र देखील जबाबदार आहे.वेळीच या कंपन्यांना आवर घातले घेत नाही. कायदा व सुव्यवस्थचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.मात्र सर्रास होणार्‍या या शस्त्र विक्रीकडे पोलिस प्रशासन गंभीर कधी होईल हाच सर्वात मोठ प्रश्‍न आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गुंडाकडून वापर
आपले नाव येऊ नये यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार, छुटपुट भाई,  यांनी शक्कल लढविली आहे.त्यांच्या गुंडगिरीने प्रभावीत झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मोबाईलचा वापर करून त्यांच्या नावावर तलवारी सारखे शत्रे ऑनलाइन बुक करतात.भविष्यात पोलीस कारवाई जरी झाली तरी गुंड मोकळे आणि विद्यार्थी पोलिसांच्या तावडीत असतील अशी शक्यता देखील नाकारता येत नाही.

शस्त्रे आढळल्यास कायदेशीर कारवाई
8शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असते कोणी ही तलवार, गुप्ती सारखे   शस्त्रे बाळगत असेल त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- डॉ.नागनाथ कोडे,
सहाय्यक आयुक्‍त, गुन्हेशाखा

दोनशे ते पाचशे रुपयात मिळते घरपोच
ऑनलाइन साहित्य विक्री मध्ये अग्रेसर असलेल्या कंपन्यावर तलवार हा शब्द जरी सर्च केला तर अनेक प्रकारच्या चमचमीत तलवारी, गुप्ती,चाकू समोर येतात 200 रु ते 900 रुपया पर्यन्त त्यांचा दर असतो एक वेळेस ते बुक केले की चार ते पाच दिवसात ती शस्त्रे आपल्याला घरपोच मिळतात.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker